महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहका...
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट देऊन बँकेच्या आर्थिक स्थितीचा व बँकेसमोरील अडचणीचा आढावा घेतला.
सर्वप्रथम बँकेचे माननीय अध्यक्ष आमदार तुषार राठोड यांनी बँकेच्या वतीने अशोकरावजी चव्हाण साहेबांचा “श्री” ची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. तसेच बँकेच्या मा.उपाध्यक्षा डॉक्टर मीनल पाटील खतगावकर यांनी सुद्धा बँकेच्या वतीने खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सत्कार केला. तदनंतर बँकेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या आर्थिक स्थिती, प्रमुख अडचणी, कृती आराखडा व भविष्यात बँकेच्या सुधारणा विषयी संक्षिप्तमध्ये माहिती दिली.
माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बँकेचे नक्तमुल्य (-) 325 कोटी वरून (+) 290 कोटीवर आले, एन.पी.ए. 88% वरून 14.18% एवढा कमी झाला व संचित तोटा 370 कोटी भरून काढून निव्वळ नफ्यामध्ये बँक आलेली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यासोबतच त्यांनी बँकेची अजूनही प्रगती करावयाची झाल्यास इतर बँका प्रमाणे डिजिटल बँकिंगवर भर देणे, ठेवी वाढविणे, एन.पी.ए. मध्ये असलेल्या संस्थांची कर्मचारी निहाय व शाखानिहाय उद्दिष्ट देऊन वसुली करणे तसेच ऑडिट कंम्प्लायन्सचे बाबतीत गांभीर्याने घेऊन कंम्प्लायन्स करणेसाठी स्वतंत्र अधिकारी यांची नियुक्ती करून त्याची पूर्तता करणेबाबत सूचना दिल्या. बँकेचा अपुरा कर्मचारी वर्ग लक्षात घेवुन बँकेमध्ये कर्मचारी भरती करावयाच्या अनुषंगाने करावयाची बिंदुनामावली तपासणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेवुन शासनाच्या मान्यता प्राप्त एजन्सी मार्फत पारदर्शक कर्मचारी भरती करणे संदर्भात मार्गदर्शन केले आहे. बँकेचे माननीय अध्यक्ष आमदार डॉ.तुषार राठोड यांनी बँकेतील कर्मचारी भरती करणे, बँकेसाठी नवीन संगणक हार्डवेअर घेणे व सॉफ्टवेअर अपडेट करणे तसेच बँकेतील ठेवीवाढी बाबत कृती आराखडा (Action Plan) तयार करून कर्मचारी निहाय ठेवीवाढ व कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देणे बाबत सूचना दिल्या. सदर बैठकीस माननीय आमदार अमरनाथ राजूरकर, बँकेच्या उपाध्यक्षा मीनल पाटील खतगावकर, बँकेचे जेष्ठ संचालक बी.आर. कदम, बँकेचे संचालक मारोतराव कवळे, श्रीनिवास चव्हाण, कैलास गोरठेकर, विजयसिंह हनेगावकर, राजेंद्र केशवे, शिवराम लुटे, रामचंद्र मुसळे, मारोतराव जाधव, राजू जाधव, ज्ञानेश्वर दहिफळे, अनिल पाटील बाभळीकर, दत्तात्रय रेड्डी, सौ.संगीता पाटील डक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.अजय कदम, सरव्यवस्थापक, प्रशांत महामुने तसेच बँकेचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले...

COMMENTS