मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात दि.11 रोजी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबा...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात दि.11 रोजी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट हे होते. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शंकर मोरे, संपूर्ण पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान व महिला कर्मचारी, तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डीवायएसपी किरण पोपळघट म्हणाले की, गणेशोत्सव हा उत्सव सर्वांनी शांततेत व एकोप्याने साजरा करावा. मिरवणुकीदरम्यान डीजे मुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा, वेळेचे बंधन पाळावे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या घ्याव्यात, नियमांचे पालन करावे, गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.यावेळी बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचे व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS