किनवट न्यायालयात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वेळ व पैशांची बचत किनवट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार...
किनवट न्यायालयात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वेळ व पैशांची बचतकिनवट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 12 सप्टेंबर रोजी किनवट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत न्यायालयीन प्रकरणांसह नगर परिषद व बँकांशी संबंधित अशी एकूण 43 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
दिवाणी न्यायाधीश मा. पी. एम. माने व सह दिवाणी न्यायाधीश मा. के. जी. मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज पार पडले. पॅनेल सदस्य म्हणून ॲड. इंदूरवार यांनी जबाबदारी सांभाळली.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, किनवट नगर परिषदेशी संबंधित कर व इतर बाबी, तसेच विविध बँकांच्या थकबाकीची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. पक्षकारांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून दोन्ही बाजूंच्या संमतीने 43 प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला.
वर्षानुवर्षे प्रलंबित वादांना मिळाला पूर्णविराम
लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रकरणांचा तडजोडीने निपटारा झाल्याने पक्षकारांचा न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारा वेळ, खर्च व श्रम वाचले. त्यामुळे नागरिकांनी लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ॲड. पंजाबराव गावंडे, ॲड. दिलीप काळे, ॲड. तौफिक कुरेशी, ॲड. राहुल सोनकांबळे, ॲड. आकाश कोमरवार, ॲड. मिनहाज बडगुजर, ॲड. संकेत राठोड यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील वर्ग, बँक अधिकारी तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS