किनवट : पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य), तालुका शाखा किनवटच्या वतीने कलावती गार्डन येथे आयोजित करण्यात आलेला ‘लोककलावं...
किनवट : पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य), तालुका शाखा किनवटच्या वतीने कलावती गार्डन येथे आयोजित करण्यात आलेला ‘लोककलावंतांचा जागर’ हा कार्यक्रम विविध लोककलांच्या बहारदार सादरीकरणाने उत्साहात पार पडला. पारंपरिक कला, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता आलामेळाव्यात आदिवासी भिल्ल नृत्य, ढेमसा नृत्य, बंजारा लेंगी नृत्य, भजन, गोंधळ, वासुदेव, भारूड, लोकगीते तसेच प्रबोधन गीतांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, लोकगीतांची सुरावट आणि कलावंतांच्या दमदार सादरीकरणामुळे कलावती गार्डनचा परिसर अक्षरशः लोककलेच्या रंगात रंगून गेला. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके होते. अमेरिकेतील कॉग्निझंट कंपनीचे सहसंचालक अभियंता सुधीर ढवळे, सुलेखा ढवळे, सिनेअभिनेते सुशांत प्रशांत ठमके, सिनेमॅटोग्राफर रुद्र पवार आणि तेलुगू अभिनेते प्रणव चिंटापटलावार यांची प्रमुख उपस्थिती होती. सिनेअभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर व मंडळाचे संस्थापक त्रिरत्नकुमार मा. भवरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
प्राचार्य शुभांगीताई ठमके व उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी लोककलेचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. स्वागताध्यक्ष युवा नेते करणभाऊ एंड्रलवार यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. आयोजक तथा तालुकाध्यक्ष दिलीप गंगाराम मुनेश्वर यांनी प्रास्ताविक केले, तर संयोजक विवेक मारोतराव ओंकार यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. प्रसिद्ध गायिका आम्रपाली वाठोरे, प्राचार्य सुरेश पाटील आणि गायिका सुनिता कीर्तन यांच्या गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोककलावंत, कलाकार व लोककलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लोककला जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते’ या संदेशातून लोककलेचे संवर्धन आणि हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश शेवाळे, केशव केंद्रे, शाहीर दिलीप कोसले, मधुकर उमरे, संजय ठोके, बालाजी वाढवे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS