30 वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’अभियानात आरोग्य तपासणी करुन पुढील गुंतागुंत टाळा - महेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी

नांदेड दि.31 : महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतुन ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ आरोग्य अभि...

नांदेड दि.31 : महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतुन ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ आरोग्य अभियान दि.1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान पुढील 100 दिवस राबबिण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तीस वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांमधील असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आहे. तरी नांदेड वासियांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.




सदर अभियानात 30 वर्ष व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषांची तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी व नोंदणी करणे, मधुमेह व उच्च रक्त्दाबाचे लवकर निदान करणे, तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करुन संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी संदर्भीत करणे तसेच तपासणीपासुन निदान, उपचार व पाठपुराव्यापर्यंतची माहिती पोर्टलवर अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.


सदर अभियान जिल्ह्यातील गावपातळीवर राबविण्यात येणार असुन तीस वर्षावरील 100 टक्के लोकांची अंससर्गजन्य आजाराबाबत तपासणी करण्यात येणार आहे. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ यासाठी सदर अभियान महत्वपुर्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके डॉ. यांनी म्हटले आहे.


        अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देश


कालावधी : हे अभियान 1 सप्टेंबरपासून पुढील 100 दिवस मिशन मोडवर राबवले जाणार आहे.


लक्ष्य गट : राज्यातील 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुष.


मुख्य उद्दिष्ट : केवळ आरोग्य तपासणी करणे नव्हे, तर आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचारांखाली आणणे. तसेच जनमानसात जनजागृती करणे आहे.


कोणत्या आजारांची होणार तपासणी?


या अभियानांतर्गत प्रामुख्याने खालील गंभीर आजारांची मोफत तपासणी, निदान आणि उपचार केले जातील.


मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure).


कर्करोग (Cancer) : यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), स्तन कर्करोग (Breast Cancer) आणि मुखाचा कर्करोग (Oral Cancer) यांची तपासणी केली जाईल.


    हे अभियान कसे राबवले जाईल?


घरोघरी भेट : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका (Asha Workers), एएनएम (ANM) आणि एमपीडब्ल्यू (MPW) दररोज सुमारे 40 ते 45 घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या नागरिकांची यादी तयार करतील.


गावनिहाय पथके : समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.


फॉलो-अप (पाठपुरावा) : तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक समुपदेशन (Counseling) आणि पुढील उपचारांची सुविधा मिळत आहे की नाही, यावर नियमित लक्ष ठेवले जाईल.


डिजिटल ट्रॅकिंग : अभियानांतर्गत होणाऱ्या सर्व तपासण्यांचे अहवाल जतन केले जातील आणि ‘डॅशबोर्ड’च्या माध्यमातून प्रगतीवर देखरेख ठेवली जाईल.


जिल्हा आरोग्य अधिकारी

 जिल्हा परिषद नांदेड

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group