नांदेड : शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे कार्य करून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) दिनांक २० सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नावारूपाला आणण्यात संचालक मंडळाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. बँकेच्या प्रगतीसाठी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवृत्त कर्मचारी मित्रांना एकमेकांची गाठभेट होणार असून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच परस्परांतील स्नेहबंध अधिक दृढ होऊन नवीन ऋणानुबंध निर्माण होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
नांदेड येथील ताज पाटील येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.. अधिक संपर्क व नाव नोंदणी 7350723499 , 94033 30773 या दूरध्वनी क्रमांकावर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS