प्रतिनिधी, कंधार
भारतीय बौद्ध महासभेची बैठक रविवार, दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक, भीमगड, कंधार येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस आनंदराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेची नवीन कंधार शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी अॅड.सिद्धार्थ वाघमारे तर सचिवपदी शिवाजी कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीच्या प्रारंभी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेची नवीन कंधार शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी ॲड.सिद्धार्थ वाघमारे, उपाध्यक्षपदी अभिजीत कंधारकर, पर्यटन उपाध्यक्षपदी राजेश्वर कांबळे, सचिवपदी शिवाजी कदम, पर्यटन सचिवपदी राजरत्न कांबळे, कोषाध्यक्षपदी मधुकर सोनकांबळे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विलास कांबळे, माजी तालुकाध्यक्ष आर.एन.गायकवाड, जितेंद्र ढवळे, नामदेव कांबळे, सी.डी.कांबळे, निलेश गायकवाड, माधवराव कदम, संभाजी कांबळे, चांदोबा कांबळे, शंकर जोंधळे, नाना गायकवाड, बळीराम कांबळे, शुभम सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

COMMENTS