किनवट - येथील नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर भागातील हैदर चौक येथे रविवारी दि.१६ रोजी सायंकाळी घरासमोर खेळत असलेल्या एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर...
किनवट - येथील नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर भागातील हैदर चौक येथे रविवारी दि.१६ रोजी सायंकाळी घरासमोर खेळत असलेल्या एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने अचानक प्राणघातक हल्ला चढविला.या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
सुभाषनगर परिसरातील हैदर चौक येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास इकरा शेख वहीद ही चिमुकली तिच्या घराजवळ खेळत असताना मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने तिच्चावर हल्ला चढविला.कुत्र्यांनी मुलीच्या गालावर,डोळ्याजवळ चावा घेतला.घटनेनंतर पीडित चिमुकलीला तत्काळ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला.सध्या तिच्यावर आदिलाबाद येथे उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर शेख वहीद शेख आमेर यांनी सोमवारी दि. १७ रोजी पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. किनवट शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, नागरिकांच्या, लहान मुलांच्या व महिलांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

COMMENTS