उमरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची श्रावण मासानिमित्त उमरी शहरातील वामनतीर...
उमरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची श्रावण मासानिमित्त उमरी शहरातील वामनतीर्थ महादेव मंदिरात दिनांक 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान भव्य दिव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून उमरी शहरात श्रावण मासानिमित्त शिव महापुराण कथा आयोजित केली जाते. त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. यंदा मंगळवारी 18 ऑगस्टपासून शिवमहापुराण कथा होईल. ओम नमः शिवाय ग्रुपच्या वतीने या कथेचे आयोजन करण्यात आले असून कथेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.या भव्य दिव्य कथेला गायक दीपक मालवे, तबला वादक संदिप गवई, ऑर्गन वादक केवल बनसोड, बॅन्जो वादक गौतम वासनिक, पॅड वादक गौरव पांडे, झाॅकी सजावट हेमराज काळे, शोशल मिडीया माधवराव पाटील, देवराव करपे आदी संगीत साथ देणार आहेत.

COMMENTS