वसमत नगर परिषद येथील कामावरून काढलेल्या ५५ कमागारांना कामावर पुन्हा रुजू केले.
नांदेड : वसमत नगर परिषद ही होंगोली जिल्ह्यात येत असली तरी आमच्या संघटनेचे साधारणता ९५ सफाई कामगार, घंटागाडी कामगार हे आमच्या सीटू कामगार संघटनेचे सभासद आहेत.
त्यापैकी ५५ कामगारांना नगरपरिषद वसमत येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कामावरून कमी केले होते.
आम्ही लढा दिला. कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्यास भाग पाडले. सीटू संलग्न मजदूर युनियनच्या कामगारांचा खूप मोठा विजय आहे.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील वसमत येथील स्थानिक असलेल्या नेत्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले असून लाल झेंडा आणि निळा झेंडा एकत्रित लढून नगराध्यक्ष यांच्या प्रतिनिधीना पर्यायी मार्ग काढावा लागला.
नगर परिषद वसमत मुख्याधिकारी यांनी कामगाराप्रती जी सहानुभूती दाखवली ती सीआयटीयु कामगार संघटना नेहमीच लक्षात ठेवेल.
मोदी सरकारच्या कार्यकाळात ५५ कामावरून काढलेल्या कामगारांना पुन्हा काम मिळवून देणे हा ऐतिहासिक निर्णय व संघर्षशील लढाठरला आहे.
कामगारांना कामावर घेण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनास दिनेश भाऊ हानमते प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (I) सम्राटराजे गायकवाड भिम टायगर सेना युवा मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार एंगडे भिम टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष, विक्की मोरे यांनी जाहीर पाठींबा देत सिओ यांना धारेवर धरले.
उप वर्गरीकरण या मुद्यावर विभक्त होणारा दलित समाज आज एकत्रित आला आणि पोट पाण्याची लढाई जिंकली.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.लता गायकवाड, डीवायएफाय संघटनेचे नांदेड तालुका अध्यक्ष काँग्रेस जयराज गायकवाड, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष वसंत हुंबाड, सचिव विशाल मोरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
वसमत नगर परिषदेचे कार्यान्वित असलेले टेंडर धारक ठेकेदार श्री प्रधान यांनी मी काम करू शकत नाही असे जाहीर करून आपले स्वतःचे टेंडर रद्द केले.
मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी वसमत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात योग्य कारवाई केली नाही तर सीआयडी चा लाल झेंडा आणि आंबेडकरी संघटनेचा निळा झेंडा एकत्रित लढाई करणार असे सीआईटीचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी जाहीर केले.
-कॉ. गंगाधर गायकवाड,. नांदेड

COMMENTS