विशेष प्रतिनिधी | नांदेड:
ज्येष्ठ साहित्यिक बी. रघूनाथ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित 'बी. रघूनाथ पुरस्कार' जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बरबडा येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' या कादंबरीला जाहीर झाला आहे. प्रा. सोळंके यांच्या पहिल्याच कादंबरीला हा महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झाल्याने साहित्यिक व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी आत्तापर्यंत समीक्षा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून, 'अरसड' या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी ललित साहित्यात दमदार पदार्पण केले आहे. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी झालेली निवड त्यांच्या प्रभावी लेखनाची अन् अभ्यासू वृत्तीची पोचपावती मानली जात आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष मा. सदाशिवराव धर्माधिकारी, सचिव तथा प्राचार्य मा. सुदर्शन धर्माधिकारी, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा. सोळंके यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS