वाढदिवस मार्कंड, जवळा व बोरगाव येथे विविध उपक्रमांनी साजरा नांदेड | प्रतिनिधी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मार्कंड, जवळा आणि बो...
वाढदिवस मार्कंड, जवळा व बोरगाव येथे विविध उपक्रमांनी साजरानांदेड | प्रतिनिधी
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मार्कंड, जवळा आणि बोरगाव कोला परिसरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांत वृक्षारोपण, धार्मिक कार्यक्रम, शालेय साहित्य वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
मार्कंड येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात बालाजी लामदाडे यांच्या वतीने ५०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर मार्कंड येथील ऋषी मंदिरात दर्शन घेण्यात आले.
जवळा येथे ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच माधव पावडे, सरपंच संतोष घाटोळ आणि उपतालुकाप्रमुख संभाजी पावडे यांच्या वतीने करण्यात आले.
जवळा येथील शाळेला संभाजी पावडे यांच्या वतीने दोन बॉक्स व अॅम्प्लिफायर भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
जवळा येथे नामदेवराव शिखरे यांच्या वतीनेही वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच बोरगाव कोला येथील हनुमान मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना
या विविध कार्यक्रमांना शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, बालाजी पाटील पुणेगावकर, तालुकाप्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख तुलजेश यादव, सुहास खराणे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे, संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, महानगरप्रमुख दीपक स्वामी, युवासेना तालुकाप्रमुख बालाजी सपुरे, पांडुरंग येवले, रोशनसिंघ जहागीरदार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, तालुकाप्रमुख स्नेहा पाटील, गवळण येवले, ज्योत्स्ना बठावाले,सुदाम बुद्रुक,श्याम पाटील वानखेडे, रवि थोरात, प्रभाकर आढाव, अंकुश शिखरे, कामाजी पाटील, प्रकाश येवले, आकाश येवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बोंढारकर म्हणाले की, मतदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहील. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू आणि माझ्या शरीरात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेची सेवा करणार असल्याचे आ.बोंढारकर यांनी सांगितले..
सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केल्याने या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

COMMENTS