कीटकनाशकाच्या फैलावाने धर्माबाद तालुक्यातील बाळापूरमध्ये काळाचा घाला (दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू)

धर्माबाद -तालुक्यातील बाळापूर गावात बुधवारी पहाटे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.घरात हरभरा बियाणे साठवून ठेवताना त्यासोबत ठेवलेल्या कीटकनाश...
धर्माबाद -तालुक्यातील बाळापूर गावात बुधवारी पहाटे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.घरात हरभरा बियाणे साठवून ठेवताना त्यासोबत ठेवलेल्या कीटकनाशकाच्या फेलावामुळे दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांची आई आणि वडील गंभीररित्या आजारी पडले आहेत.
बाळापूर येथील *डेवेकर कुटुंबाने* घरात हरभरा बियाणे साठवले होते. बियाण्याला कीड लागू नये म्हणून त्याच्यासोबत कीटकनाशकाचे औषध हवाबंद डब्यात ठेवण्यात आले होते. घरातील बंदिस्त जागेत या औषधाचा वायू फेलावला आणि झोपेत असलेल्या मुलांना त्याचा विषारी परिणाम झाला.
सकाळी मुलींची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच *६ वर्षीय आरोही डेवेकर* आणि *४ वर्षीय आराध्या डेवेकर* या दोघींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत त्यांचे आई-वडील यांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही बातमी कळताच संपूर्ण बाळापूर गावावर शोककळा पसरली. डेवेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.या दुर्दैवी घटनेनंतर कृषी विभाग व आरोग्य विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बियाणे आणि कीटकनाशके ही लहान मुलांच्या आवाक्याबाहेर, हवेशीर आणि स्वतंत्र खोलीत ठेवावीत. कीटकनाशक हाताळताना काळजी घ्यावी आणि त्याचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
ग्रामस्थांनीही अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने गावोगावी जनजागृती करावी अशी मागणी केली आहे.या प्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group