धर्माबाद: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धर्माबाद तालुका भाजप परिवाराच्या वतीने उद्या शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य...
धर्माबाद: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धर्माबाद तालुका भाजप परिवाराच्या वतीने उद्या शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात येणार आहे.
“हर घर तिरंगा, हर मन तिरंगा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार असून, भगवान महावीर चौक (ब्राह्मण चौक), शिवटेकडी–महर्षी वाल्मिकी चौक (आंध्र बसस्टँड), राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, बाळापूर–नरेंद्र चौक, नेहरू चौक, सरस्वती दयानंद चौक, डॉ. आण्णाभाऊ साठे चौक, रत्नाळी–लहुजी साळवे चौक मार्गे हुतात्मा पानसरे चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर हुतात्मा स्मारक, धर्माबाद येथे कार्यक्रम होईल. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित या तिरंगा रॅलीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप परिवार, धर्माबाद तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS