यशवंत ' मध्ये ‘MY Bharat’ विद्यार्थी विशेष नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. ११ जुलै २०२६ :                 भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्र, जिल्हा युवा अधिका...


नांदेड, दि. ११ जुलै २०२६ : 

               भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्र, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय व यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘MY Bharat विद्यार्थी नोंदणी अभियान’ उत्साहात पार पडले. या अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलवर नावनोंदणी करून राष्ट्रीय स्तरावरील विविध युवा उपक्रमांशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम विकसित भारत @२०४७ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आयोजित करण्यात आला होता. 

               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी, माय भारत या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास, स्वयंसेवा, कौशल्यविकास, इंटर्नशिप, प्रशिक्षण, सामाजिक उपक्रम आणि रोजगारक्षमतेच्या विविध संधी उपलब्ध होत असून प्रत्येक विद्यार्थ्याने या राष्ट्रीय अभियानाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.

              प्रमुख मार्गदर्शिका सुश्री अशनी अनिल कानकटे, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, नांदेड (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्वयंसेवी उपक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, इंटर्नशिप, नेतृत्व विकास कार्यक्रम, डिजिटल प्रमाणपत्रे, विविध शासकीय विभागांसोबत काम करण्याच्या संधी, तसेच विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, पर्यावरण संवर्धन, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक विकास अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांच्या शंका निरसरण करण्यात आले. 

              प्रास्ताविक डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले तर सूत्रसंचलन बी.ए.तृतीय वर्षातील कोमल कागदेवाड यांनी केले. आभार ज्ञानेश्वर डाके यांनी मानले.

              कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ. कैलाश इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांचे सहकार्य लाभले. उपस्थित विद्यार्थ्यांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोर्टलवर नाव नोंदणी केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group