MPSC ऑफलाइन परीक्षा आंदोलन : दिवस ६ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normali...
MPSC ऑफलाइन परीक्षा आंदोलन : दिवस ६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization लागू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने MPSC मुख्यालय, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण व धरणे आंदोलनाच्या आज सहाव्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. रामचंद्र (आबा) दळवी आणि प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचा या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.
आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रख्यात अभ्यासक, लेखक आणि मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधत सार्वजनिक भरती प्रक्रिया ही पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि राज्य शासनाने तातडीने संवाद साधून योग्य निर्णय घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी CBT परीक्षा पद्धती, Normalization, तांत्रिक त्रुटी, सर्व्हर समस्या, डिजिटल असमानता, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, तसेच अलीकडील भरती प्रक्रियांबाबत निर्माण झालेल्या शंका आणि न्यायालयीन निरीक्षणांची माहिती त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांचा विरोध तंत्रज्ञानाला नसून, अपारदर्शक आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संध्याकाळी आंदोलनस्थळी “MPSC जागर” या विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील समाजप्रबोधनाच्या परंपरेतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी भजन, अभंग आणि जनजागृतीपर गीतांच्या माध्यमातून शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे एक वेगळी सामाजिक दिशा मिळाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा विरोध तंत्रज्ञानाला नसून अपारदर्शक, अविश्वसनीय आणि वादग्रस्त परीक्षा व्यवस्थेला आहे. समान संधी, गुणवत्तेवर आधारित निवड आणि परीक्षेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ऑफलाइन (OMR) परीक्षा पद्धतच योग्य असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.
आंदोलनादरम्यान पुढील प्रमुख मागण्या पुन्हा मांडण्यात आल्या –
* MPSC चा CBT परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
* सर्व पूर्व, मुख्य व इतर भरती परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
* Normalization प्रणाली लागू करू नये.
* प्रश्नपत्रिका गळती, तांत्रिक गैरव्यवहार आणि परीक्षा घोटाळे रोखण्यासाठी कठोर व प्रभावी कायदा करावा.
* भरती प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करावे.
* परीक्षा पद्धतीत कोणताही मूलभूत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी
आंदोलनाला दिवसेंदिवस राज्यभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. हा लढा केवळ एका परीक्षा पद्धतीविरोधातील नसून पारदर्शक, विश्वासार्ह आणि गुणवत्ताधिष्ठित सार्वजनिक भरती व्यवस्थेसाठीचा व्यापक लोकशाही संघर्ष असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
उद्याच्या (दि. १४ जुलै २०२६) आंदोलनाची रूपरेषाही जाहीर करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सकाळी १०.०० वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी हे दुपारी १.०० वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक व्यापक सामाजिक पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य शासनाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हे शांततापूर्ण, लोकशाहीवादी आणि संविधानिक आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS