नांदेड महानगरपालिकेची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप: आता नागरिकांना घरबसल्या मिळणार ऑनलाईन गुंठेवारी प्रमाणपत्र..!!

नांदेड,दि.६ जुलै: नांदेड शहरातील नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने गुंठ...

नांदेड,दि.६ जुलै: नांदेड शहरातील नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला पूर्णपणे हायटेक केले आहे. आता नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्या चकरा मारण्याची गरज नसून, ही सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.या नवीन डिजिटल प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन गुंठेवारी प्रमाणपत्रांचे वितरण नुकतेच महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात लाभार्थ्यांना सुपुर्द करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, गटनेता संदिपसिंग गाडीवाले, साबेर चाऊस तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त अभिजीत वायकोस, गुंठेवारी कक्षाचे उपअभियंता खुशाल कदम, कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि डिजिटल पाऊल उचलत ऑनलाईन गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा अधिकृत शुभारंभ करतांना महापालिका प्रशासना मार्फत प्रातिनिधीक स्वरुपात हनुमंत नरसिंगराव बोदरवाड, गणेश चंद्रय्या कटकम, दिपक पुंडलिकराव कांबळे,गजानन एकनाथ चक्रवार, संजीवकुमार शंकरराव तळवणे व रामदास गणपतराव वावधाने या नागरिकांना पहिल्या ऑनालईन गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.या ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना आता घरबसल्या किंवा अधिकृत आर्किटेक्ट/इंजिनिअरमार्फत आपले प्रस्ताव थेट ऑनलाईन सादर करता येतील त्यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे कामात गती येईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल. या गुंठेवारी प्रमाणपत्रांवर सक्षम प्राधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असेल, ज्यामुळे हे प्रमाणपत्र सर्व शासकीय कामांसाठी वैध ठरेल. ऑनलाईन प्रणालीमुळे अर्जाची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक विकास शुल्क ऑनलाईन भरण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे.अशी आहे ऑनलाईन गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया

1. महापालिकेकडील नोंदणीकृत आणि परवानाधारक आर्किटेक्ट, इंजिनिअर किंवा सुपरवायझर यांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावा लागेल.

2. अर्जासोबत विहित नमुन्यातील कागदपत्रे, भूखंडाचा नकाशा आणि छाननी शुल्क सादर करावे लागेल.

3. महापालिकेच्या गुंठेवारी कक्षातील तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत प्रस्तावाची आणि जागेची ऑनलाईन छाननी केली जाईल.

4. प्रस्ताव पात्र ठरल्यानंतर नागरिकांना ऑनलाईन चलन जनरेट होईल, ज्याची रक्कम भरल्यानंतर तात्काळ डिजिटल स्वाक्षरीयुक्त गुंठेवारी प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

महापौर व आयुक्तांचे आवाहन

याप्रसंगी बोलताना महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी सांगितले की, "नांदेडला स्मार्ट आणि डिजिटल शहर बनवण्याच्या दिशेने हे आमचे मोठे पाऊल आहे. नागरिकांनी मध्यस्थांच्या अमिषाला बळी न पडता या ऑनलाईन सुविधेचा थेट लाभ घ्यावा". तसेच पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले की, "विहित मुदतीत ज्या नागरिकांचे भूखंड किंवा बांधकामे नियमानुकूल पात्र आहेत, त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच ऑनलाईन गुंठेवारी ही आर.टी.एस.अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असुन महापालिकेच्या एकुण ७४ सेवासह गुंठेवारीची सेवा सुध्दा भविष्यात सेतु सुविधा केंद्रांमार्फत सुरु करुन नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा मानस आहे".या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त अभिजीत वायकोस यांनी केले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group