आरोग्यसेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या जैविकशास्त्र संकुलामार्फत शै...
आरोग्यसेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या जैविकशास्त्र संकुलामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (B.Sc. MLT) हा रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. NEET नंतर एमबीबीएस व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या "मराठवाड्यातील विद्यार्थी लवकरात लवकर स्वावलंबी झाला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो जागतिक स्पर्धेत सक्षमपणे टिकला पाहिजे," या दूरदृष्टीतून तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व अथक प्रयत्नांतून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
आधुनिक आरोग्यसेवा व्यवस्थेत डॉक्टरांइतकीच महत्त्वाची भूमिका वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञांची असते. विविध आजारांच्या अचूक निदानासाठी रक्त, लघवी, पेशी, ऊती आदींच्या तपासण्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षित वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञांची मागणी सातत्याने वाढत असून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणारा ठरत आहे.
तीन वर्षांच्या या कौशल्याधारित अभ्यासक्रमामध्ये नैदानिक जीवरसायनशास्त्र, रक्तशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, ऊतीविकृतशास्त्र, अण्विक निदानशास्त्र, नैदानिक रोगविज्ञान, रक्तपेढी व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण तसेच आधुनिक प्रयोगशाळेतील उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभवही दिला जातो.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्लिनिकल लॅबोरेटरी सायंटिस्ट, पॅथॉलॉजी लॅब तज्ज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, अण्विक निदान तंत्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र व जीवरसायनशास्त्र प्रयोगशाळा विशेषज्ञ, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक व व्यवस्थापक अशा विविध पदांवर सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांनी या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैविकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले आहे.

COMMENTS