लातूर : लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व मा. श्री. नरसिंह घोणे यांच्या वाढदिवसानिमित...
लातूर : लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व मा. श्री. नरसिंह घोणे यांच्या वाढदिवसानिमित्त "प्लास्टिकमुक्त भारत" या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. "आपले आरोग्य, आपलीच जबाबदारी" या अभियानाच्या वतीने गोलाई, लातूर येथे भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे हा होता. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्लास्टिकला नकार देऊन कापडी पिशवीचा स्वीकार करण्याचा संकल्प केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्लास्टिकमुळे पर्यावरण, जलस्रोत, जनावरे तसेच मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. प्रत्येक नागरिकाने बाजारात जाताना स्वतःसोबत कापडी पिशवी बाळगावी आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तरच प्लास्टिकमुक्त लातूर, प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र आणि प्लास्टिकमुक्त भारत हे स्वप्न साकार होऊ शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
"आपले आरोग्य, आपलीच जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती, नियमित व्यायाम आणि प्लास्टिकमुक्त भारतासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय परळकर, शिरीषकुमार तुकाराम शेरखाने, संतोष सोनवणे, राम रोडगे, वीरभद्र तरगुडे, संजय राजुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी नागरिकांशी संवाद साधत प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी "चला, प्लास्टिकला नकार देऊया... कापडी पिशवीचा स्वीकार करूया... पर्यावरण वाचवूया!" असा संदेश देत उपस्थित नागरिकांनी प्लास्टिकमुक्त भारताच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.

COMMENTS