नांदेड: जिल्ह्याच्या विकासकामांची गती, निधीचा विनियोग आणि रखडलेले प्रकल्प आता थेट विधीमंडळाच्या रडारवर येणार आहेत. महाराष्ट्र राज्य विधानमंड...
नांदेड: जिल्ह्याच्या विकासकामांची गती, निधीचा विनियोग आणि रखडलेले प्रकल्प आता थेट विधीमंडळाच्या रडारवर येणार आहेत. महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समिती ७ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात समिती जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे.
📌 काय आहे दौऱ्याचा मुख्य उद्देश?
राज्य सरकारकडून विविध विभागांना मिळणारा निधी योग्य ठिकाणी खर्च होतोय का? योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतोय का? आणि कामांचा दर्जा कसा आहे? याची पडताळणी करण्यासाठी ही उच्चस्तरीय समिती नांदेडमध्ये मुक्कामी असणार आहे.
🗓️ असा असेल 'मिनिट-टू-मिनिट' कार्यक्रम:
७ एप्रिल (मंगळवार): रात्री समितीचे नांदेडमध्ये आगमन व शासकीय विश्रामगृहात मुक्काम.
८ एप्रिल (बुधवार): * सकाळी ९:०० वा. प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
सकाळी १०:०० ते सायं ५:३० पर्यंत विविध शासकीय प्रकल्प, कार्यालये आणि विकासकामांना प्रत्यक्ष भेटी व पाहणी.
९ एप्रिल (गुरुवार): सकाळी १०:०० वाजेपासून दिवसभर महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या प्रकल्पांची ऑन-फील्ड तपासणी.
१० एप्रिल (शुक्रवार): * दुपारी २:०० वाजेपर्यंत उर्वरित विभागांच्या कामांची पाहणी.
दुपारी ३:०० वा. सांगता बैठक: ४ दिवसांच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी आणि माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्य बैठक व चर्चा.
🔍 या विभागांच्या कामांवर असणार 'वॉच':
अंदाज समिती महसूल, वन, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरविकास, कृषी, ग्रामविकास (रस्ते), गृह, आरोग्य, पाणी पुरवठा, पर्यटन, पर्यावरण, सहकार, उच्च व तंत्रशिक्षण आणि जलसंपदा अशा २५ पेक्षा जास्त विभागांच्या कामांचे मूल्यमापन करणार आहे.
⚠️ प्रशासनाची धावपळ!
समितीच्या या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. रखडलेली कामे आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी अलर्ट मोडवर आले आहेत. प्रत्यक्ष भेटीदरम्यान समिती काय अहवाल देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS