श्रीक्षेत्र माहूर श्री दत्त शिखर संस्थानचे पप्पू महंत मधुसूदनजी भारती यांच्या अंतिम दर्शन व निरोप विधीसाठी रविवारी माहूर गडावर हजारो भाविकां...
श्रीक्षेत्र माहूर श्री दत्त शिखर संस्थानचे पप्पू महंत मधुसूदनजी भारती यांच्या अंतिम दर्शन व निरोप विधीसाठी रविवारी माहूर गडावर हजारो भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळाली संपूर्ण प्रक्रिया दरम्यान शहरातील मान्यवरा सह नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी ठिकठिकाणी पाणी वाटप महाप्रसादात भाग घेत गर्दी ओसरल्यानंतर स्वच्छता अभियानाला गती देऊन गडासह माहूर शहरात महास्वच्छता अभियान राबविल्याने नगरपंचायत चे पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे
माहूर शहरातील मुख्य रस्ता टी पॉईंट सह श्री रेणुका माता मंदिर श्री दत्त शिखर संस्थान या सर्व विविध ठिकाणी भाविकांनी तसेच शहरातील सर्वधर्मीय मान्यवर व्यवसायिकांनी ठिकठिकाणी महाप्रसादाचे स्टॉल्स लावून आलेल्या लाखो भाविकांना महाप्रसाद बंद बाटल्यांचे पाणी वाटप केले आलेला प्रत्येक भाविक परत जाओ पर्यंत हा महाप्रसाद सुरू होता शहरातील परोपकारी नागरिक युवकासह माहूर नगर पंचायतने तात्काळ पुढाकार घेत महाप्रसाद पाणी वाटपात सहभाग घेतला सोमवारी सकाळी दत्त शिखर परिसर व पायथा येथे व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.
विशेष म्हणजे, या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष, नगरसेवक व त्यांच्या प्रतिनिधींनी स्वतः स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष मैदानात उतरून सहभाग नोंदवला. गड परिसर, पायथा, मुख्य रस्ते तसेच भाविकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली नगर पंचायतच्या या तत्पर, जबाबदार आणि सेवाभावी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, स्वच्छतेच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS