नांदेड (ग्लोबल मराठवाडा वृत्तसेवा): "जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी आपल्या सखोल अभ्यासाने आणि नियोजनब...
नांदेड (ग्लोबल मराठवाडा वृत्तसेवा): "जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी आपल्या सखोल अभ्यासाने आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीने लेखा विभागाला एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळेच जिल्हा परिषदेचा आर्थिक कारभार अत्यंत पारदर्शक आणि प्रभावीपणे चालला," असे गौरवोद्गार नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले.३१ मार्च रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले शिवप्रकाश चन्ना यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कै. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित भव्य निरोप समारंभात त्या बोलत होत्या.महिला सक्षमीकरण आणि टीमवर्कवर भर
मुख्य कार्यकारी अधिकारी कावली पुढे म्हणाल्या की, चन्ना साहेबांनी केवळ स्वतःचे काम चोख बजावले नाही, तर आपल्या सहकाऱ्यांना प्रशिक्षित करून एक सक्षम टीम तयार केली. विशेषतः विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक देऊन कामात सक्षम बनवले. "मी दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी कधीही नाकारली नाही आणि प्रत्येक कामात अचूकता राखली. भविष्यातही लेखाविषयक मार्गदर्शनासाठी आम्ही त्यांचा सल्ला घेत राहू," असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेचा सन्मान आणि सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेघना कावली यांच्या हस्ते शिवप्रकाश चन्ना यांचा सपत्नीक शाल, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी चन्ना यांचे दोन्ही चिरंजीव उपस्थित होते. तसेच, उमरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अडबलवार हे देखील सेवानिवृत्त झाल्याने त्यांनाही यावेळी निरोप देण्यात आला. मानपत्राचे वाचन उपशिक्षणाधिकारी निळकंठ पांचगे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते
संदीप माळोदे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी): चन्ना साहेब मितभाषी असले तरी कामात अत्यंत शिस्तबद्ध होते. विविध विभागांचा निधी वेळेत खर्च व्हावा, यासाठी त्यांचा पाठपुरावा कौतुकास्पद होता.
धनराज पांडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मनपा): कोषागार विभाग आणि स्थानिक लेखा परीक्षण विभागातही चन्ना साहेबांनी आपली छाप सोडली आहे.
शिवप्रकाश चन्ना (सेवानिवृत्त अधिकारी): "१९८६ पासून सुरू झालेल्या या प्रवासात मला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या पाठबळामुळेच मी ही दीर्घ सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकलो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूरकुमार आंदेलवाड, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, गट विकास अधिकारी विश्वनाथ अडबलवार, शेखर देशमुख, उपशिक्षणाधिकारी निळकंठ पाचंगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राजेश जोंधळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवराज माटाळकर यांनी मानले.

COMMENTS