नांदेड: चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठात संपन्न झालेल्या 'अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवक महोत्सवात' स्वामी रामानंद तीर्...
नांदेड: चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठात संपन्न झालेल्या 'अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवक महोत्सवात' स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या संघाचे व्यवस्थापक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांनी बजावलेली भूमिका या यशाचा मुख्य आधारस्तंभ ठरली आहे. २५ वर्षांनंतर सुवर्ण कामगिरी: या महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने विविध कलाप्रकारात आपली मोहोर उमटवली:
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य डॉ. सुग्रीव फड, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनृत्य: तब्बल २५ वर्षांनंतर या प्रकारात भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. (संदीप कोडापे, रितेश मडावी, पीयूष तोडसाम).
- शास्त्रीय सुरवाद्य: चिन्मय मठपती याने भारतातून द्वितीय क्रमांक मिळवला.
- लोकसंगीत: गणेश कदम याने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.
- इतर यश: स्वाती कंधारे हिने क्रिएटिव्ह डान्स, मूक अभिनय आणि विडंबन अशा तीन प्रकारांत यश मिळवले.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य डॉ. सुग्रीव फड, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS