लातूर | प्रतिनिधी ग्रंथाली संस्कृतीची जोपासना आणि ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी वडवळ नागनाथ (ता. चाकूर) येथे जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघा...
लातूर | प्रतिनिधी ग्रंथाली संस्कृतीची जोपासना आणि ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी वडवळ नागनाथ (ता. चाकूर) येथे जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ४१ वे वार्षिक अधिवेशन शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. अमर ज्योती ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.तीन सत्रांत रंगणार वैचारिक मेजवानी
वटसिद्ध नागनाथ मंदिराच्या प्रांगणात होणारे हे अधिवेशन तीन सत्रांत पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता भव्य 'ग्रंथदिंडी'ने होईल. या दिंडीचे पूजन विश्वासराव पाटील, गंगाधरअप्पा कल्याणे, राम मोतीपवळे व अशोकराव खोडवे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
राज्यातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
सकाळी ११ वाजता होणाऱ्या मुख्य उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार भूषविणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून:
वर्षा ठाकूर-घुगे (जिल्हाधिकारी, लातूर)
डॉ. नागोराव कुंभार (ज्येष्ठ साहित्यिक)
अशोक गाडेकर (ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य) यांच्यासह ग्रंथालय क्षेत्रातील अनेक नामवंत पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आदर्श कार्यकत्यांचा गौरव व पुरस्कार वितरण
या अधिवेशनात सहकार मंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे:
राज्यस्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार: रवींद्र कालेकर (कै. ॲड. त्र्यंबकदास झंवर स्मृती)
जीवन गौरव पुरस्कार: हावगीराव बेरकीळे (माजी अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ)
जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार: अशोक मुंढे (स्वामी विवेकानंद वाचनालय, किनगाव) तसेच, शासन नियुक्त 'ग्रंथमित्र' धनंजय पवार व सूर्यकांत जाधव यांचाही विशेष सत्कार केला जाणार आहे.
चर्चासत्रे आणि ठराव वाचन
दुपारच्या सत्रात 'कर्मचारी समस्या व उपाय' या विषयावर किरण बाबळसुरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यानंतर खुली चर्चा व ठराव वाचनाने अधिवेशनाचा समारोप होईल. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
उपस्थितीचे आवाहन: अमर ज्योती ग्रंथालयाचे अध्यक्ष वैजनाथअप्पा नंदागवळे, सचिव वसंत बेरकीळे आणि संयोजन समितीने या ग्रंथोत्सवास जिल्ह्यातील ग्रंथालय प्रेमी, कर्मचारी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS