नांदेड महानगरपालिकेतील क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ (अशोक नगर) येथे राजेश पाटील यांची प्रभारी सहाय्यक आयुक्त पदावर करण्यात आलेली नियुक्ती पू...
नांदेड महानगरपालिकेतील क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ (अशोक नगर) येथे राजेश पाटील यांची प्रभारी सहाय्यक आयुक्त पदावर करण्यात आलेली नियुक्ती पूर्णपणे नियमबाह्य असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उपशहर प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी केला आहे. या नियुक्तीची तात्काळ चौकशी करून त्यांना मूळ पदावर न पाठवल्यास, येत्या ३० मार्च २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आला आहे.
काय आहेत मुख्य आरोप?
विक्रम पाटील बामणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, सहाय्यक आयुक्त (गट ब) पदासाठी सेवा प्रवेश नियम २०२४ नुसार, संबंधित अधिकाऱ्याने 'कार्यालय अधीक्षक' पदावर किमान ३ वर्षे सेवा केलेली असणे आवश्यक आहे. मात्र, राजेश पाटील हे केवळ 'वरिष्ट लिपिक' असताना त्यांना 'जम्पिंग प्रमोशन' देऊन थेट प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार कसा सोपवण्यात आला? असा सवाल उपस्थित होत आहे. ही नियुक्ती राजकीय दबावापोटी किंवा अन्य आर्थिक कारणास्तव झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजेश पाटील यांची मनपातील मूळ नियुक्ती. निवेदनानुसार, राजेश पाटील यांना त्यांच्या भावाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली आहे. मात्र, त्यांच्या वडिलांच्या जागी आधीच त्यांच्या दुसऱ्या भावाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळालेली आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का? याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे असून, यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बामणीकर यांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून राजेश पाटील यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास ३० मार्च पासून लोकशाही मार्गाने मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

COMMENTS