श्रीक्षेत्र माहूर : बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील विद्यार्थ्यांनी पोलीस दलात यश मिळव...
श्रीक्षेत्र माहूर : बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील विद्यार्थ्यांनी पोलीस दलात यश मिळवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला आहे. कु. श्रद्धा चुगडे, दिशा तिलेवाड आणि विशाल वानखेडे यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे माहूर तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
"आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस दलात स्थान मिळवणे ही संपूर्ण शैक्षणिक परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द आणि योग्य दिशा असेल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही," असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी केले.
या यशाबद्दल सचिव सौ. संध्याताई राठोड, प्राचार्य डॉ. विलास पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त पोलीस जवानांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS