भोकर: (प्रतिनिधी) "परिस्थिती आडवी येत नाही, जर जिद्द मोठी असेल," हे भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचा विद्यार्थी दिनेश शंक...
भोकर: (प्रतिनिधी) "परिस्थिती आडवी येत नाही, जर जिद्द मोठी असेल," हे भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचा विद्यार्थी दिनेश शंकर दिवटेकर याने सिद्ध करून दाखवले आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) द्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या JAM (Physics) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत दिनेशने यश संपादन केले असून, महाविद्यालयाच्या इतिहासात १२ वर्षांनंतर सुवर्णअक्षरांनी नवा अध्याय लिहिला आहेपहाटे पेपर वाटप, दुपारी प्रयोगशाळेत सराव दिनेशची ही यशोगाथा अत्यंत संघर्षमय आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दररोज पहाटे भोकर शहरात वृत्तपत्र वितरणाचे काम करतो. कडाक्याची थंडी असो वा पाऊस, पेपर वाटप करून तो न चुकता महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या तासाला उपस्थित राहायचा. त्याच्या या शिस्तीचे आणि अभ्यासावरील निष्ठेचे फळ आज त्याला मिळाले आहे.१२ वर्षांनंतरची ऐतिहासिक कामगिरी गेल्या १२ वर्षांपासून अनेक विद्यार्थी या कठीण परीक्षेत यश मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भूपेश नेम्मानीवार, प्रा. साईनाथ पांचाळ आणि प्रा. श्रीनिवास चव्हाण यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली दिनेशने सातत्यपूर्ण अभ्यास करून हा मान मिळवला. बीएससीच्या पहिल्या वर्षापासूनच त्याला या परीक्षेची गोडी लागली होती, ज्याचे रुपांतर आता राष्ट्रीय स्तरावरील यशात झाले आहे.
IIT आणि NIT चे दरवाजे उघडले! या यशामुळे दिनेशला आता देशातील नामवंत IIT (Indian Institute of Technology) किंवा NIT सारख्या संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनेश आता एक नवा 'रोल मॉडेल' ठरला आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव: दिनेशच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय माधवराव पाटील किनाळकर साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. "परिश्रम आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही," असा संदेश दिनेशने आपल्या कृतीतून दिला आहे.

COMMENTS