महिला बाथरूम मध्ये कॉपी आली कुठून शहरात जोरदार चर्चाना उधाण श्रीक्षेत्र माहूर श्रीक्षेत्र माहूर शहरातील नामांकित श्री जगदंबा विद्यालयात बार...
महिला बाथरूम मध्ये कॉपी आली कुठून शहरात जोरदार चर्चाना उधाण
श्रीक्षेत्र माहूर श्रीक्षेत्र माहूर शहरातील नामांकित श्री जगदंबा विद्यालयात बारावीच्या जीवशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.१७ वाजता तहसीलदार अभिजित जगताप यांच्या पथकाने अचानक तपासणी केली असता एका विद्यार्थिनी जवळ बाथरूम मधून वर्गात जात असताना वर्गाबाहेर नक्कल आढळून आली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विविध चर्चांना उधाण आले आहेमिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार अभिजित जगताप परीक्षा तपासणीसाठी श्री जगदंबा विद्यालयात गेले असता परीक्षा सुरू असताना दोन विद्यार्थिनी वर्गखोली बाहेरील बाथरूममधून वर्ग खोलीकडे येताना दिसल्या संशय आल्याने त्यांनी त्यांची झडती घेण्याचे निर्देश दिले असता एका विद्यार्थिनी जवळ कॉपी आढळून आली. तत्काळ संबंधितांवर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.एका बाजूला प्रशासनाकडून परीक्षा सुरू असलेल्या विद्यालयावर कडक देखरेख केली जात असताना दुसऱ्या बाजूला परीक्षा केंद्रांवर नक्कल प्रकरणे उघड होत असल्याने वर्गावरील शिक्षक, बैठे पथक, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पोलीस तसेच जिल्हास्तरीय पथकांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, श्री जगदंबा विद्यालयाच्या महिला बाथरूममध्ये विद्यार्थ्यांना नक्कल साहित्य सहज कसे उपलब्ध झाले, हा देखील चौकशीचा विषय ठरत असून महिला लघु शंका गृहामध्ये कॉपी आली कुठून हा विषय शहरात जोरात सुरू असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर मध्ये सुरू असलेल्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे अन्यथा जिल्हाधिकारी यांना जे दाखवले गेले तेच दिसेल गैरप्रकार दिसणार नाहीत अशी जोरदार चर्चा सुरू असून वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार होऊन दोषी नसणाऱ्या अधिकारी कर्मचारी विद्यालयावर विनाकारण कारवाई होऊन अन्याय होईल अशी चर्चा होत आहे

COMMENTS