नांदेड: नांदेड शहरालगत असलेल्या नेरली गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या ...
नांदेड: नांदेड शहरालगत असलेल्या नेरली गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र अविश्वास निर्माण झाला असून, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
गावकऱ्यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
• गेल्या चार दिवसांत केलेली वॉर्ड रचना आणि मतदार यादीचे काम तात्काळ रद्द करण्यात यावे.
• यापुढील सर्व निवडणूक प्रक्रिया आणि शासकीय कामे ही व्हिडिओ चित्रीकरणाच्या (Video Recording) माध्यमातून ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे करण्यात यावीत.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नेरलीकरांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यात नेरलीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी उपसरपंचांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराचे आरोप
महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजवल्यानंतर प्रभाग रचना (वॉर्ड रचना) आणि मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, ही वॉर्ड रचना करताना नियमांना बगल देऊन माजी उपसरपंचांच्या मर्जीनुसार आणि त्यांच्या पॅनलच्या फायद्यासाठी फेरफार केली जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व शासकीय कामे ग्रामपंचायत कार्यालयातून न होता माजी उपसरपंचांच्या घरातून केली जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रेस नोटद्वारे करण्यात आला आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड (भ्रष्टाचार) झाल्याची चर्चाही गावात रंगली आहे.
गावकऱ्यांच्या मुख्य मागण्या आणि इशारा
गावातील प्रतिष्ठित आणि सुशिक्षित नागरिकांनी ग्रामसेवक व तलाठी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती, मात्र तरीही अधिकारी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.गावकऱ्यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:

COMMENTS