मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड येथे सर्पदंश उपचार व संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केलेल्या डॉ. दिलीप पुंडे यांना प्रजासत...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड येथे सर्पदंश उपचार व संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केलेल्या डॉ. दिलीप पुंडे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातून विशेष निमंत्रण प्राप्त झाले होते. डॉ. पुंडे यांनी सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.
राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधण्याची संधी डॉ. पुंडे यांनी मिळाली. ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी व्हावेत, यासाठी डॉ. पुंडे यांनी वैज्ञानिक पद्धतीने उपचार विकसित केले.
मागील 38 वर्षांपासून डॉ. दिलीप पुंडे हे सेवावृतीने या भागात आरोग्य
सेवा देत आहेत. 1988 ते 1997 या काळात ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. 1997 पासून पुंडे हॉस्पिटल मुखेड (नांदेड) येथे ते कार्यरत आहेत. आज पर्यंत लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. सर्पदंशाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. 1988 साली या भागात सर्पदंशाचा मृत्यूदर अंदाजे 25 टक्के होता. 2024-25 पर्यंत हा मृत्यू दर शुन्य टक्क्यांवर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. 2015 साली भारतातर्फे ऑक्सफर्ड
विद्यापीठात सर्पदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. आजपर्यंत त्यांनी पाच लाख लोकांचे सर्पदंशाविषयी मोफत जनजागरण केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 10 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये सर्पदंशावर त्यांची व्याख्याने झाली आहेत. राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समितीचे ते सदस्य आहेत. 2021 पासून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू. एच.ओ.) सर्पदंश तज्ञसमितीचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय सर्पदंश कृती आराखडा समितीचेही ते सदस्य आहेत. डॉ.पुंडे यांना मिळालेल्या बहुमानाबद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
.jpg)
COMMENTS