पुणे: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री. रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये हनुमान मंदिर जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे महापुरुष नाशिक वरून पुण्याकडे सज्जन गडावर जात असताना त्याकाळात थोरांदळे गावातील गावकऱ्यांनी या महापुरुषांना हनुमान मूर्तीची स्थापना करण्याची विनंती केली. त्यानुसार चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर थोरांदळे गावात मारुतीच्या मूर्तीची स्थापना झाली. तेव्हापासून या गावातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला मारुती नवसाला पावतो. अशी या गावातील मारुती मंदिराची ख्याती आहे. तेव्हापासून थोरांदळे गावात हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून लोकप्रिय आहे. हनुमान मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी ब्राह्मणाने विधीयुक्त पूजा केली ग्रामस्थांनी २१ कोटी राममंत्र लिहिलेल्या वह्या गावात जमा करण्यात आल्या. भूमीपूजन प्रसंगी पवित्र गंगा नदी व इतर नद्यांचे जल, पंचधातू, सोने, चांदी अशा प्रकारे ग्रामस्थांमधील काही दानशूर मान्यवरांनी देणग्या देऊन या पवित्र कार्याला सहकार्य केले. त्या सर्वांचे थोरांदळे हनुमान मंदिर ग्रामस्थ विश्वस्त मंडळ तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले. या सुंदर अशा सोहळ्याला थोरांदळे गावातील पुरुष, महिला, तरुण वर्ग आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोरांदळे येथील जुन्या मंदिराची १९७० मध्ये बांधणी झाली. पूर्वी हे मंदिर केवळ आतील गाभाऱ्या पुरतेच मर्यादित होते. असे गावकरी मंडळी सांगतात. जसा काळ बदलत गेला तसे सत्तरच्या दशकात हे मंदिर उभे राहिले. त्याकाळी मारुती मंदिर हे पूर्णपणे दगडात बांधले गेले. मंदिरासाठी पूर्णपणे सागवान लाकूड वापरले गेले. मागच्या पिढीने हे जुना मंदिर उभं केलं, तर आता नवीन पिढी लोकसमूहातून व देणगीच्या माध्यमातून नव्याने मारुतीचे भव्य मंदिर उभे करीत आहे. आता मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थ व देणगीच्या रूपाने या मंदिराच्या बांधकामासाठी पैसा कधीही कमी पडणार नाही असे जाणकार मंडळी सांगतात.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा