परभणी (. ) महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नाशिक जिल्हा असोसिएशन वतीने दि. २८ ते ३० जून दरम्यान ३५ वी वरीष्ठ गट राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत स्कॉड प्रकारात छ. संभाजीनगर विजेता तर परभणी उपविजेता ठरला तृतीय क्रमांक बीड, वाशिम जिल्हयाने पटकावले.
अंतिम सामना छ.सभाजीनगर वि परभणी या दरम्यान २:१ सेट मध्ये छ.संभाजीनगर विजेता तर परभणी उपविजेता ठरला.
परभणी जिल्हा स्कॉड संघात
विजय चौधरी , निलेश बानाटे, साई पोफळे , रामराव कांदे, निलेश काळके ,पांडुरंग केंद्रे, संघ प्रशिक्षक कैलास टेहरे,
राज्य स्पर्धेतील यशाबद्दल राज्य अध्यक्ष विपीन कामदार, राज्य सरचिटणीस डॉ.योगेंद्र पांडे, जिल्हा अध्यक्ष
आ. राजेश विटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे,मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, डॉ .अमृता पांडे, डॉ.विनय मून, डॉ .परवेज खान, मनोज बनकर, सज्जन जैस्वाल, प्रशांत नाईक, , अब्दुल अन्सार, यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

addComments
टिप्पणी पोस्ट करा