सेलू येथे जिल्हास्तरीय खुल्या टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात निलेश माळवे तर महिला गटात श्रेया उपासे विजेता*



सेलू (               )16 जुलै जागतिक टेनिस  व्हॉलीबॉल  दिन व डॉ. व्यंकटेश वांगवाड वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन कला व क्रीडा मंडळ सेलू व परभणी जिल्हा  टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने  जिल्हास्तरीय खुल्या टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजन दि. १६ जुलै रोजी नूतन इनडोअर क्रीडा हॉल  सेलू वतीने आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन मा.उपनगराध्यक्ष संदिप भैय्या लहाने यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे, पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार, राज्य सचिव गणेश माळवे,जिल्हा सचिव सतिश नावाडे, डी.डी.सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत पुरुष गटात 29 तर महिला गटात 16 खेळाडूंनी सहभागी नोंदवला होता.

अंतिम सामना 20 जुलै रोजी 

निलेश माळवे वि. शेख यासेर दरम्यान अतितटी सामन्यात निलेश माळवे 2:1 सेट मध्ये विजेता ठरला. तर शेख यासेर उपविजेता तर तृतीय क्रमांक वर शेखर ताठे .

महिला गटात: कु. श्रेया उपासे प्रथम, कु. दुर्गेश्वरी अर्जुने व्दितीय, तर कु. कार्तिकी गोरे तृतीय क्रमांक पटकावला 

स्पर्धेत विजेता खेळाडूंना प्रथम बक्षीस:-2000/-व ट्रॉफी ,

व्दितीय बक्षीस:-1000/- व ट्रॉफी.तृतीय बक्षीस:- 500/-व ट्रॉफी 

बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनायकराव कोठेकर (सचिव नूतन शि. संस्था) तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप भैय्या लहाने, युवा उद्योजक अविनाश बिहाणी, प्रभाकर सुरवसे, चंद्रशेखर नावाडे, गणेश माळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठोड तर आभारप्रदर्शन प्रशांत नाईक, यांनी मानले.

          स्पर्धेत विजेता  पुरुष महिला खेळाडू राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दिल्ली साठी पाञ ठरणार आहे. रोख बक्षीस 1 लाख रु.राहिल. 

 मा.आ.हरीभाऊ काका लहाने, राज्य सचिव गणेश माळवे, संदिप भैय्या लहाने, चंद्रशेखर नावाडे, जिल्हा सचिव सतिश नावाडे,  प्रशांत नाईक, संजय भुमकर ,राजेश राठोड, आदी केले आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव सतिश नावाडे, अनुराग आंबटी, राहुल घाडगे, दिपक निवळकर, प्रमोद गायकवाड, कपिल ठाकुर आदी परीश्रम घेतले.

टिप्पण्या