शंकर बोईनवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन


उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक शंकर बोईनवाड यांच्या आदर्श नगरीचा राजू या किशोर कादंबरीचे प्रकाशन उदगीर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कविवर्य इंद्रजित भालेराव यांचे हस्ते प्रकाशन झाले आहे.यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, मसापचे रामचंद्र तीरुके, दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे,अभिनेत्री आदिती सारंगधर, मार्तंड कुलकर्णी, भारत सातपुते, बस्वराज पाटील नागराळकर , सतीश उस्तुरे व मान्यवर उपस्थित होते. शंकर बोईनवाड यांचे बाल साहित्यातील तिसरे पुस्तक असून यापूर्वी चिव चिव चिमणी , कोल्हेवाडीचा बाजार ही दोन बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांचे हे बाल साहित्यातील तिसरे पुस्तक असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या