मुंबई - सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त कुर्ला विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. मंगेश कुडाळकर यांच्या पुढाकाराने ५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ दरम्यान चेंबूर येथे मुंबई फेस्टिवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिवस पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मा. श्री .एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे, मराठी भाषेचे राज्यात, देशात नव्हे तर जगामध्ये महत्त्व वाढणार आहे. गेल्या अडीच वर्षात आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपल्या विभागात चांगली कामे केली आहेत. ठीक ठिकाणी त्यांचे मोठे बोर्ड लागलेले दिसतात. तिसऱ्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आहेत, यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते. मुंबई फेस्टिवल सारख्या कार्यक्रमातून लोकांची चांगली करमणूक होते आणि ती गरजेची आहे. असे स्पष्ट उदगार संसद पट्टू खासदार मा. श्री. श्रीकांत शिंदे यांनी गौरव सोहळ्यात काढले.
सुप्रसिद्ध गायक, मराठी संगीतकार व सत्कारमूर्ती मा. श्री. कौशल इनामदार यांनी गेल्या पंधरा वर्षात मराठी भाषेची खूप प्रगती झाली आहे. आजच्या व्यासपीठावर सर्वच कार्यक्रम मराठीत होतात. सर्वच मराठीत बोलतात, याचा मला अभिमान आहे. ज्येष्ठ पत्रकार व सत्कारमूर्ती रजनीश राणे यांनी सांगितले की, मराठी बोला, मराठी वाचा, आणि मराठी लिहा. दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठवण दिवस हा कार्यक्रम महाराष्ट्रातून करीत आहे. मुंबईत देखील तीन शाळांमधून हा कार्यक्रम केला जातो. महाराष्ट्रात मराठीचा आठवण करून देणारा दिवस साजरा करावा लागतो, ही एक शोकांतिका आहे. परंतु ते कार्य करणे, ही आज काळाची गरज आहे. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. त्यासाठी मराठी आठवणीचा दिवस हा कार्यक्रम करावा लागतो. आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व मान्यवरांचे स्वागत करून, आपल्या भाषणात सांगितले की, मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी कलाकारांचा गुणगौरव करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे आपणास नेहमी सहकार्य मिळते. सिनेअभिनेते सुशांत शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना रोजगार मिळावा म्हणून मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ६७ कोटीचा फंड दिला आहे. त्या प्रित्यर्थ मराठी कलाकारांच्या वतीने मा श्रीकांत शिंदे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मराठी भाषा दिवसानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे या मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मराठी लोकगीतांचा भरगच्च कार्यक्रम झाला. या संगीतमय कार्यक्रमात महाराष्ट्राचा हास्य दरबार या मालिकेतील अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन झी मराठीच्या वृत्त निवेदिका सौ. पूर्वी भावे यांनी केले. मराठी भाषेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी कुर्ला विधानसभेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा