नांदेड:( दि.१८ फेब्रुवारी २०२५)
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत महासत्तेचे उद्दिष्ट ठेवले; मात्र हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. भारताने निश्चितच क्रांतिकारक प्रगती केली. संपूर्ण जगामध्ये भारताची युवकांचा देश म्हणून ओळख आहे. भारताने महासत्ता होण्यासाठी विद्यार्थी आणि युवकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यानंतरच भारत महासत्ता होऊ शकेल; असे प्रतिपादन परिषदेचे उद्घाटक माजी पालकमंत्री व श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी.पी.सावंत यांनी केले.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम:उषा) योजनेअंतर्गत यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे 'विकसित भारताचा रोड मॅप @ २०४७' या विषयावरील दोन दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात दि. १७ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. बी.एम.खंदारे, बीजभाषक त्रिभुवन विद्यापीठ, काठमांडू, नेपाळ येथील डॉ. राधेश्याम प्रधान, राजभात विद्यापीठ, बँकॉक, थायलंड येथील डॉ.अरुण चैनीट, सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात येथील डॉ.कामिनी शहा, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, आयोजक सचिव उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक ज्ञान हे समाजाच्या प्रगतीसाठी असावयास हवे. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक नेतृत्व करण्याइतपत प्रगतिशील अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील चार देश आणि भारताच्या १२ घटक राज्यातील २५० प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला आहे, असे मनोगत व्यक्त केले.
उद्घाटनाच्या प्रारंभी भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानंतर सहभागी प्रतिनिधींचा शोधनिबंध संग्रह 'शोध ऋतु' याच्या सॉफ्ट कॉपी तसेच ग्रंथाचे आणि डॉ.हरिश्चंद्र पतंगे लिखित ग्रंथाचे प्रकाशनदेखील करण्यात आले.
संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचे युट्युब लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
प्रास्ताविक डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भारती सुवर्णकार आणि प्रा.प्रियंका सिसोदिया यांनी केले. आभार डॉ.राजरत्न सोनटक्के यांनी मानले.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील डॉ. मोहम्मद आमेर, प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.आत्माराम जाधव, प्रा.बालाजी तुरेकर, प्रा.विठ्ठल राठोड, प्रा.शिवकन्या तोडकर, प्रा.मनीषा देशमुख यांनी परिश्रम घेतले तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखापाल अभय थेटे, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये स्टेज कमिटी समन्वयक डॉ.संजय जगताप, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.कैलास इंगोले, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, श्री. ए.बी.कदम, श्री.पंडित बेळीकर, टेक्निकल कमिटी समन्वयक डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.योगेश नकाते, डॉ. मदन अंभोरे, श्री.एम.आर.कल्याणकर, श्री.व्ही. जी.अडबलवार, नोंदणी समिती समन्वयक डॉ.मंगल कदम,डॉ.रत्नमाला मस्के, प्रा.शांतूलाल मावस्कर, प्रा.एस.डी.माने, डॉ.ए.यू. जाधव, श्री.के.एस.इंगोले, श्री.व्ही. पी.इंगोले, भोजन समिती समन्वयक डॉ. संतोष मोरे, डॉ.अजय टेंगसे, डॉ.संकेत देलमाडे, डॉ.मिरा फड, प्रा. राजश्री भोपाळे, प्रा.व्ही.एस.राठोड, श्री.डी.जे.पिटलेवाड, श्री. बी.एम.शिंदे, निवास आणि लोकल मुव्हमेंट कमिटी समन्वयक डॉ.शिवराज शिरसाठ, सदस्य डॉ.दिगंबर भोसले, डॉ. निलेश चव्हाण, डॉ.बी.एस. तुरइकर, श्री. भीमराव तालिकोटे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा