नांदेड:( दि.२९ सप्टेंबर २०२४)
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या सुयशाबद्दल यशस्वी संघाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण, माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, डॉ.मनोज पैंजणे, प्रा. कैलास दाड, प्रा.उत्तम केंद्रे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा