मुंबई पोर्ट ट्रस्टमधील गुणवंत कामगार भिवा टेमगिरे सेवानिवृत्तमुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील किनारा कामगारांमधील गुणवंत कामगार पुरस्कार विजेते भिवा राधू टेमगिरे हे  पोर्ट  ट्रस्टमधील ४१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर   ३१  मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने गोदी विभागातील कामगार कर्मचाऱ्यांतर्फे भिवा टेमगिरे यांचा  इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंग येथे  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

दिवा टेमगिरे हे प्रामाणिक व कष्टाळू कामगार आहेत. त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टची प्रामाणिक व निष्कलंकपणे सेवा केली. ते एक अन्नदाते असून अध्यात्मिक विचारसरणीचे आहेत. त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्राप्त होवो. अशा प्रकारच्या शुभेच्छा मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव,  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपगोदी  प्रबंधक शैलेश चव्हाण,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक  वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर,  सद्गुरु सिताराम स्वामी महाराज संस्थेचे सचिव शिंदे आदी मान्यवरांनी दिल्या . सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप नलावडे यांनी केले तर आउटडोर डॉक स्टाफ पूजा समितीचे पदाधिकारी संदीप घागरे यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्याला पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी अधिकारी, युनियन पदाधिकारी, नातेवाईक व कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या