नांदेड/ प्रतिनिधी
शहरातील हनुमान पेठमधील ज्येष्ठ महिला श्रीमती प्रभावती गोविंदराव जामकर यांचे २७ मे रोजी रात्री ११ वाजता निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुले प्रा.राजेश, ॲड.संजय, मुलगी, सुना,जावई,नातवंडे,भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी, २८ रोजी दुपारी १२ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी जामकर यांच्या निवासस्थानी भाजपाचे आ.राम पा.रातोळीकर, माजी महापौर प्रकाश मुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि जामकर कुटुंबाचे सांत्वन केले.
श्रीमती प्रभावती जामकर यांचे निधन.
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा