राम दातीर
माहुर ( प्रतिनिधी ) माहुर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दिनांक २१एप्रील २०२३रोजी दुपारी चार वाजताचे दरम्यान तालुक्यातील ईवळेश्वर, वानोळा परिसरात वादळी वार्यासह जोराचा पाऊस गारपीट झाल्यामुळे शेतातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांवरील छपर उडाले व घरांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे याभागातील शेतकरी चिंतातूर झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले ही बाब आमदार केराम यांना समजताच संकटात सापडलेल्या वैफल्यग्रस्त शेतकरी व नागरीकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार केराम दिनांक २२एप्रिल रोजी भल्या पहाटेच तहसिलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेउन तांदळा,ईवळेश्वर,कुपटी,वानोळा,गाव माहादापुर ईत्यादींसह नुकसग्रस्त भागाची पाहणी करून त्वरीत नुकसानीचे पंचनामे केले.आमदार भीमराव केराम यांनी स्वतःहा जातीने लक्ष घालून नुकसानगग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी धाउन आले त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे शेतकरी व नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,तालुका। अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर,शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामूने, तालुका सरचिटणीस नीळकंठ मस्के, जेष्ठ कार्यकर्ते नंदकुमार कोलपवार,, शिवाजी राखोंडे,जीवन अग्रवाल, नागोराव सुर्वे,,यांचेसह शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

COMMENTS