पंचनाम्यात वेळ न घालवता आपतीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा - माजी आ.शंकरअण्णा धोंडगे

  कंधार तालुका प्रतिनिधी   अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने नांदेड जिल्ह्याला अक्षरश्या जोडपून काढले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे, घ...

 

कंधार तालुका प्रतिनिधी 

 अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने नांदेड जिल्ह्याला अक्षरश्या जोडपून काढले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी मुळे हवालदिल झालेल्या शेतकरी व आपती ग्रसतांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने  पंचनामे करण्यात वेळ न घालवता प्रशासनाने त्यांना सरसकट व तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी नेते माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी केली आहे.   
                   गुरुवार ( दि.16) रोजी वारे, वादळा सह झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने जिल्ह्यातील नांदेड, कंधार, लोहा, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, देगलूर, नायगाव यासह जवळपास सर्वच तालुक्यातील शकडो गावांना पावसाने नुकसान पोहचवले आहे. हाता, तोंडाशी आलेले हरबरा, गहू, ज्वारी, टाळकी, करडई, मक्का, केळी, खरबूज, टरबूज आदी पिकांसह आंब्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची ही पडजड झाली आहे. घरावरील पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात शिरून घरातील साठून ठेवलं पीक, घरगुती सामानाचे ही मोठे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्याने अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत
                      शेतमालाला बाजार पेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आदीच आर्थिक अडचणीत आले आहेत. रोग राई सोबतच विविध अडचणीचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिके जगविली होती. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केलेली ही अवस्था अत्यंत दुदैवी आहे. संकटात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनामे करण्यात वेळ न घालवता प्रशासनाने सरसकट शेतकऱ्यांना व आपती ग्रसतांना तातडीने आर्थिक मदत करावी तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या हाळदा (ता. कंधार ) येथील ज्ञानेश्वर सदाशिव भालेराव या शेतकऱ्याच्या कुटुंबास ही तात्काळ आर्थिक मदत करावी असे ही माजी आ. धोंडगे म्हणाले.
*शंकरअण्णा कडून आपतीग्रस्त गावांची पाहणी* 
कंधार तालुक्यातील कौठा, शिराढोण जिल्हा परिषद सर्कल मधील गावांनाही या आपतीचा मोठा फटका बसला आहे. या भागातील नुकसान झालेल्या अनेक गावांना भेट देवून शंकरअण्णा धोंडगे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी व आपती ग्रसतांशी संवाद साधला तेथूनच तहसीलदार यांना पंचनामे या प्रशासकीय करभारात न अडकवता नुकसानीचा सरसकट अहवाल पाठवावा अश्या सुचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समिती दिगंबर वडजे, बारूळचे उपसरपंच जयराम कांबळे यादी कार्यकर्ते होते. 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group