नांदेड,20- माणसाचा शेवट अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसरात करणारी एक वेगळीच स्मशानभूमी लोहा तालुक्यातील रायवाडी येथे तयार करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या स्मशानभूमीला इथल्या सुविधांमुळे आयएसओ मानांकन मिळाले आहे. आज सोमवार दिनांक 20 मार्च रोजी ग्रामपंचायतीला आयएसओ स्मशानभूमीचे मानांकन, प्रमाणपत्र व ट्रॉफी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे त्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. यावेळी ग्रामविकासचे माजी सहसचिव तथा सिनेअभिनेते एकनाथ उर्फ अनिल मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, गटविकास अधिकारी शैलेश वावळे, सरपंच मनीषा विभुते, ग्रामसेवक जे.डी. मंगनाळे आदींची उपस्थिती होती. गावात सर्व धर्मीय लोकांनी एकजुटीने सुंदर आयएसओ स्मशानभूमी केलेली आहे. इतर विकास कामातही लोकसहभाग उत्कृष्ट आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घेण्याजोगा असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नांदेड,20- माणसाचा शेवट अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसरात करणारी एक वेगळीच स्मशानभूमी लोहा तालुक्यातील रायवाडी येथे तयार करण्यात आली. महत्त्वाचे...
सदर स्मशानभूमीमध्ये फळ, फुल व ईतर 222 वृक्ष तसेच 105 बाबूंची लागवड करण्यात आली आहे. 71 शोभेच्या कुंड्या ठिक-ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. दहा मोठे अभंगांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. दोन स्वतंत्र रूम या ठिकाणी आहेत. इथे पक्षांसाठी 8 पानवठे तयार करण्यात आलेत, महादेवाची मूर्ती बसण्यात आली. 27 बेंच, डोली, पिण्याच्या पाण्याची टाकी, सूचनापेटी, प्रथमोपचार पेटी, अस्थी स्टॅन्ड अशा विविध सुविधा या स्मशानभूमीमध्ये देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्युत व्यवस्था ही इथे करण्यात आली आहे.
रायवाडी गावची लोकसंख्या 2 हजार 14 आहे. गावामध्ये पूर्वी स्मशानभूमीमध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या. परंतु ग्रामस्थांनी रायवाडी येथील वैकुंठधाम आगळावेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्धार केला व त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. यातून ही आदर्शवत स्मशानभूमी तयार झाली आहे. आज या आयएसओ स्मशानभूमीचे नामांकन प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी शैलेश वावळे यांनी केले. गावासंदर्भातली भूमिका एकनाथ मोरे यांनी विशद केली. यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
-
नांदेड:(दि. १ जून २०२६) यशवंत महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेन्ट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२...
COMMENTS