राम दातीर श्रीक्षेत्र माहूर(प्रतिनिधी )महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी एक मुळपीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात सध्या चैत्र नवरा...
राम दातीर
श्रीक्षेत्र माहूर(प्रतिनिधी )महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी एक मुळपीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात सध्या चैत्र नवरात्र महोत्सव साजरा केला जात आहे. मंगळवार दि.28 मार्च रोजी चाळीस विदेशी भाविकांनी श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन जोगवा गाऊन गोंधळ घातला.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व पोलंड या देशातून आलेल्या 40 भाविकांनी श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन मातेच्या दरबारात गायलेला जोगवा ऐकून व घातलेला गोंधळ पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव व व्यवस्थापक योगेश साबळे यांनी विदेशी भाविकांचे स्वागत केले.


COMMENTS