भारतीय विद्यापीठ संघ व हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत सायन्स क...
भारतीय विद्यापीठ संघ व हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत सायन्स कॉलेजच्या कुमारी जान्हवी सावर्डीकर या खेळाडूने 76 वजन गटामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त करून सायन्स कॉलेज व विद्यापीठाचे नाव अखिल भारतीय स्तरावर उज्वल केले आहे. व त्यांच्या यशाबद्दल नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा. सौ. शामलताई पत्की यांनी विशेष सत्कार करून जान्हवी च्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वेंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सहसचिव एड. प्रफुल्ल अग्रवाल विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठल सिंह परिहार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. यु.गवई, उपप्राचार्य प्रो. डॉ. सौ.अरुणा राजेंद्र शुक्ला, उपप्राचार्य डॉ. एल पी शिंदे, उपप्राचार्य श्री एकनाथ खिल्लारे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अश्विन बोरीकर, प्रा. रंजन राठोड व कॉलेजचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS