नांदेड, दि.१७ (प्रतिनिधी) ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व आयुधांचा वापर करून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केल्या बद्दल अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या वतीने "गोदावरी अर्बन" ला सलग सातव्यंदा बँको पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते संस्थेच्या उपाध्यक्ष हेमलता देसले, मुख्यालयाचे अधिक्षक विजय शिरमेवार,विपणन अधिकारी महेश केंद्रे,शाखा व्यवस्थापक भारत राठोड यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा एव्हरशाईन रिसॉर्ट, महाबळेश्वर येथे संपन्न झाला.
गोदावरी अर्बनने आपल्या एक दशकाच्या प्रवासात कायमच आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे.संस्थेच्या सर्व शाखा सुसज्ज व संगणीकृत आहेत.यासोबतच नरिमन पॉईंट मुबंई येथे या सर्व शाखांना जोडण्यासाठी सेंट्रल हबची निर्मिती केली आहे.येथील सर्व कामकाज फिनटेक या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यने चालते.संस्था कायमच आपले कामकाज पारदर्शक व्हावे याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व आयुधांचा वापर करीत असते.संस्थेच्या या सर्व कामकाजाच्या माहितीचे मूल्यांकन सहकार क्षेत्रातील तज्ञ निवड समतीने केले.त्यात संस्थेची अव्वल कामगिरी पाहून अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इनमा यांच्या वतीने गोदावरी अर्बनचा बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यालयाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत कदम,आय.टी.उपव्यवस्थापक पवन यादव,दिग्रस शाखा व्यवस्थापक राहूल कोल्हे,उमरखेड शाखा व्यवस्थापक धनंजय क्षीरसागर,वर्धा शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर कामडी,अकोला शाखा व्यवस्थापक प्रशांत शंकपाळ,महागाव शाखेचे अधिकारी गोपाल खोडके,कावली शाखा अधिकारी व्ही सायंदर,विजयवाडा शाखेचे उपव्यवस्थापक पी सुब्रमण्यम उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील व समस्त संचालक मंडळांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व सर्व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले.
.jpg)
COMMENTS