राज्य शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुले गटात छत्रपती संभाजी नगर तर मुलीत पुणे विभाग विजयी* राज्य शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा...
![]() |
| राज्य शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुले गटात छत्रपती संभाजी नगर तर मुलीत पुणे विभाग विजयी* |
![]() |
| राज्य शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे मुले छञपती संभाजीनगर तर मुलीत पुणे विभाग विजयी संघ |
परभणी (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा ,(१४ व १७ वर्षाखालील मुले/मुली) गटात
क्रीडा स्पर्धेचा दि. २९ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल परभणी अंतिम फेरीत 14 व 17 वर्षे मुले गटात छत्रपती संभाजी नगर तर मुलीत पुणे विभाग विजयी ठरले.
अंतिम फेरीत U/14 मुले गटात
नाशिक विरुद्ध छञपती संभाजीनगर दरम्यान अतितटीच्या लढतीत
छञपती संभाजी नगरचा 35-26, 21-35 आणि 35-17 असा विजय प्राप्त केला.यात
प्रथम:छञपती संभाजीनगर,
व्दितीय -नाशिक,तृतीय-पुणे.
U/14 मुलीच्या गटात
छञपती संभाजी नगर विरुद्ध पुणे दरम्यान रंगतदार सामन्यात
35-33, 35-23 अशी बाजी पुणे विभाग ने मारली , यात प्रथम;पुणे, व्दितीय: छञपती संभाजीनगर, तृतीय: नागपूर
U/17 मुले च्या गटात
छञपती संभाजी नगर विरुद्ध पुणे दरम्यान चुरशीच्या लढतीत
35-17, 30-35 , 35-33 अशा तीन होऊन छञपती संभाजीनगर विजेता ठरला, यात प्रथम;छञपती संभाजीनगर, व्दितीय: पुणे , तृतीय: अमरावती
U/17 मुली गटात
मुंबई विरुद्ध पुणे दरम्यान तीन सेट च्या चुरशीच्या लढतीत
35-27, 30-35 आणि 35-18 असा पुणे विभाग विजयी ठरला.
प्रथम: पुणे, व्दितीय: मुंबई
तृतीय- नागपूर
बक्षीस वितरण सोहळास परभणी, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडाधिकारी शैलेंद्र सिंग गौतम,उत्तमराव हत्तीअंबीरे अध्यक्ष परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, बॉलबॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू मधुकर निर्मल, स्पर्धा निरीक्षक शरद वाबळे, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, जिल्हा शा.शि. संघटना अध्यक्ष रणजित काकडे, थ्रोबॉल राज्य कार्याध्यक्ष कैलास माने, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, हॅन्डबॉल राज्य उपाध्यक्ष शंकर शहाणे, राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी.डी.सोन्नेकर, मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळास संपन्न झाला.
कार्यक्रम चे प्रस्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, सुञसंचलन किशोर ढोके आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम,
स्पर्धेत पंच प्रमुख सौगत दत्ता, रुचिता नांदुरकर, राजेश खांगर, योगेश काटोके, माऊस्वामी कोणार, विक्रम झाडे, मेघश्याम शिंदे, सुनिल माळवटकर, ऋग्वेद मुळे, यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सुशीलकुमार देशमुख, शिवाजी वाघमारे, विजयकुमार तिवारी, महेश काळदाते, विश्वास पाटील, किशोर ढोके, कैलास टेहरे, तुकाराम खटींग, शिवाजी काकडे, महेश शिंदे,विजय गारकर, सौ. ज्योती दिक्षित, स्वाती कांबळे, शिवाजी खुणे, प्रकाश पंडित, धिरज नाईकवाडे, योगेश आदमे, योगेश जोशी,कलीम शेख, राजेश ढबाले, सचिन चाकुरकर, राहुल घांडगे, महेंद्र धबाले, आदी परीश्रम घेतले.


COMMENTS