मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या यांत्रिक अभियंता खात्यातील मुख्य समय पाल, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व अलंग युनियनचे खजिनदार विकास नलावडे उर्फ नाना हे मुंबई पोर्टमधील ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा खात्यातील कामगारांनी ( ई.ई.एन.डी. विभाग ) ३० नोव्हेंबर २०२२ रोजी वर्कशॉप येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार सोहळ्यात विकास नलावडे यांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, नाना हे युनियनचे संगणक होते, त्यांनी गोदी कामगारांच्या पगारवाढीबाबत चांगले सहकार्य केले असून ते एक निष्ठावंत प्रामाणिक व सेवाभावी कार्यकर्ते आहेत.
याप्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधीकरणाचे माजी विश्वस्त सुधाकर अपराज, केरसी पारेख, युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुख्य यांत्रिक अभियंते मानस मंडल, बोर्ड मेंबर दत्ता खेसे, मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त निर्माते जयु भाटकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, नवी मुंबई सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नलावडे, इंडस्ट्री ऑलचे प्रोजेक्ट ऑफिसर प्रवीण राव, दामोदर नलावडे, सौ. विनया नलावडे, कु. श्वेताली भिडे, मुंबई पोर्टचे सेवानिवृत्त गोदाम अधिक्षक डी. आर. नलावडे,सामाजिक कार्यकर्ते विष्णू नलावडे, अलंग युनियनचे संघटक सचिव शब्बीर खलानी, उपाध्यक्ष विठोबा पवार,सेवानिवृत्त कार्यकर्ते अविनाश कोलगे, मुख्य समयपाल अरुण पाटील आदी मान्यवरांची विकास नलावडे यांच्या सामाजिक व कामगार चळवळीतील आधारे मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी मुंबई टांकसाळ मजदूर सभेचे मुकुंद वाजे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, नुसीचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी, खाजगी कंपन्यांचे कार्यकर्ते, विकास नलावडे यांचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युनियनचे कमिटी मेंबर सतीश घाडी यांनी सुंदर केले, तर आभार युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी मानले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS