परभणी : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सॉफ्ट हॉकी असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी प्रा. डॉ. सिंकू कुमार सिंह तर सरचिटणीसपदी प्रा. रमाकांत बनसोडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती हौशी सॉफ्ट हॉकी फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव रमेश कुमार सिंह यांनी कळविले
आहे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट हॉकी असोसिएशन, ही संघटना सॉफ्ट हॉकी फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नीत आहे प्रा. डॉ. सिंकु कुमार सिंह हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्कूल ऑफ इंटर डिसीप्लिनरीचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत तर प्रा. रमाकांत बनसोडे हे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर संचलित उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा), म्हणून कार्यरत आहेत डॉ. सिंकू कुमार व प्रा. बनसोडे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रासह देशभर शहरी व ग्रामीण भागात सॉफ्ट हॉकीचा प्रसार प्रचार व विकास वेगाने होईल असे मानले जात आहे या निवडीनंतर बोलताना डॉ. सिंकू कुमार व रमाकांत बनसोडे यांनी आपण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून असोसिएशनची बांधणी करणार असल्याचे सांगितले त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. उदय चव्हाण, डॉ. बी एस बाविस्कर, डॉ. अशोक गिणगिने, डॉ. भीमा केंगले, डॉ. दीपक सोनटक्के, डॉ. प्रदीप तळवेलकर, डॉ. प्रसेनजीत बनसोडे, डॉ. दीपक शेंडकर, डॉ. सुधीर इंगळे, डॉ. कुलजित राणा, पत्रकार राजा पुजारी, गोकुळ तांदळे आदींनी अभिनंदन केले आहे

COMMENTS