प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहर वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक सय्यद यांनी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर अवैध वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकाविरुद्ध कारवाई चा धडाका सुरूच आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात आवघ्या 27 दिवसांत 3138 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 28 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. फक्त 12 कर्मचाऱ्यांवर वाहतुकशाखेचा भार असुन कमी कर्मचारी असुन सुद्धा पोलिस निरीक्षक सय्यद यांनी वाहतुक शाखेत दमदार कारवाई केली आहे. यामध्ये राजकिय सभा,मंत्री दौरे, आंदोलने, मोर्चे, धार्मीक उत्सव, भारतजोडो यात्रा आदी विविध कार्यक्रमात वाहतुक शाखेला कमी कर्मचारी असतांना सुद्धा पोलिस निरीक्षक सय्यद यांनी उत्कृष्ट नियोजन करून वाहतुक बंदोबस्त पार पाडला. कर्तव्य बजावत असतांना वाहतुक कर्मचाऱ्यांना छोट्या मोठ्या वादाच्या प्रसंगाला ही सामोरे जावे लागते. नोव्हेंबर महिन्यात वाहतुकिचे नियम मोडणाऱ्या 2420 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या कडून 16 लाख 95 हजार 700 रूपायांचा दंड वसूल केला आहे. अतीवेगाने वाहन चालविणाऱ्या 718 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 10 लाख 72 हजार 500 रूपये दंड असा वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे एकुण 3138 वाहनांवर कारवाई करून 27 लाख 68 हजार 200 रूपायांचा दंड वसूल केला आहे. व कर्णकर्कश आवाज करणारी धोकादायक 3 वाहनांवर कारवाई करून 78 हजार 500 रूपये दंड वसूल केला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोलीचे पोलीस निरीक्षक A.I. सय्यद व वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अंमलदार यांनी केली.हिंगोली जिल्ह्यातील वाहनधारकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन 18 वर्षाखालील मुला – मुलींना देऊ नये, असे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल वाहनात केलेले अनधिकृत बदल (कर्णकर्कश हॉर्न/ सायलेन्सर) पूर्ववत करावे, तसेच स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मोटार सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा, धोकादायकरित्या किंवा ओव्हर स्पीड वाहन चालवू नये, सीट बेल्टचा वापर करावा. शहरात वाहन व नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात येऊ नये, विरुद्ध दिशेने वाहन चालू नये ट्रिपल सीट वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वाहनांवर स्पष्ट दिसेल असा नंबर टाकण्यात यावा, दोन-तीन आकडी नंबर किंवा रंगीत फॅन्सी नंबर प्लेट इत्यादी मध्ये दुरुस्ती करून शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे नंबर प्लेट बसविण्यात याव्यात आदी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सर्व खाजगी वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शहर वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS