सेलू (. ) जिल्हा क्रीडाधिकारी परभणी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू यांच्या वतीने आयोजित शालेय क्रिकेट व कुस्ती क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन नूतन महाविद्यालय सेलू येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. परभणी जिल्हा लोकसभा समन्वयक मा.आ. हरीभाऊ काका लहाने म्हणाले खेळाडूंनी , मैदानावर येऊन सातत्याने सराव करावा , मोबाईल पासून दुर राहावे. व मैदानी खेळ खेळावे, सेलू तालुक्यातील क्रिकेटपटु भारतीय संघात खेळावा. यासाठी आपण जय्यत तयारी करावी, असे उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे प्रमुख पाहुणे उद्घाटक मा.आ.हरीभाऊ लहाने, डॉ. अनिकेत जोगदंड, डॉ अशिष महेता, गुलाब रोडगे, विनायक रोडगे,पर्यवेक्षक प्रा. नागेश कान्हेकर , तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे ,प्रा. के.के.कदम, उपस्थित.
सदरील स्पर्धा १४/१७/१९/ वर्षांखालील मुले व मुली च्या गटात स्पर्धा संपन्न झाल्या.
१४ वर्षांआतील मुले गटात प्रथम: एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू तर व्दितीय: यासेर उर्दू हायस्कूल सेलू.
१७ वर्षांआतील मुले गटात:- नूतन विद्यालय सेलू तर
व्दितीय: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू
१७ वर्षातील मुली गटात: न्यु.मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू.
स्पर्धा आयोजक राजेश राठोड,
स्पर्धेस पंच म्हणून प्रमोद गायकवाड,अलीम पठाण,सूरज शिंदे, जिशन सिद्दीकी , ताहेर पठाण होते.


COMMENTS